निर्भीडसत्ता न्यूज –
मुंबई : ऑक्टोबरमध्ये झालेल्या भेटीनंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. अवघ्या महिन्या भरात घेतलेल्या दुसर्या भेटीनंतर आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास एक तास चर्चा झाली. जितेंद्र आव्हाड पुस्तक प्रकाशनाचे आमंत्रण देण्यासाठी मातोश्रीवर गेल्याची माहिती देखील मिळत आहे. भेटीदरम्यान या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली हे अद्याप कळू शकलेले नाही.