निर्भीड न्यूज –
मानव संसाधन क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी एकत्र येवून स्थापन केलेल्या ‘व्हायब्रंट एचआर’ संघटने तर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्याच उपक्रमाचा भाग म्हणून दि.5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन घोरावडेश्वर येथे वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला.
व्हायब्रंट एचआर ग्रुप तर्फे याअगोदर देखील घोरावडेश्वर येथे प्लास्टिक मुक्त घोरावडेश्वर तसेच फ्रेंडशिप डे मैत्री झाडांशी असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. आज घोरावडेश्वर येथे 50 विविध झाडाचे रोपण करून त्यांच्या सावर्धानाची शपथ घेण्यात आली.
दाखवले आहेत व्हाटसप सारख्या प्रभावी माध्यमाचा वापर करून किती मोठे काम उभे करू शकता येते याची प्रचीती व्हायाब्रंट एच आर ग्रुपद्वारे येते. बावीस जनांनी एकत्र येऊन मानव संसाधन क्षेत्रासमंधी ज्ञानाची देवाणघेवाण करणे व वेगेवेगळ्या विषयावर चर्चा करून एच आर क्षेत्रातील एक हक्काच व्यासपीठ तयार करण्यासाठी सुरु केलेल्या या व्हायाब्रंट एच आर ग्रुपचे रुपांतर दोन हजार तीनशे लोकांच्या एका मोठ्या समुहात झाले आहे. व्हायाब्रंट एच आर ग्रुप, व्हायाब्रंट एच आर पोलीस मित्र मंडळ, व्हायाब्रंट एच आर भटकंती, व्हायाब्रंट एच आर जॉब फोरम, व्हायाब्रंट एच आर पर्यावरण व अघोगिक सुरक्षा असे विविध ग्रुप आहेत.