निर्भीड न्यूज –
दहावी इयत्तेचा निकाल उद्या (दि.६) जूनला जाहीर होणार असल्याची माहिती, पुणे शिक्षण मंडळान दिली आहे. दहावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीन जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेचा निकाल सोमवारी दि.६ जून रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना १५ जूनला शाळेवर मार्कशीट मिळणार आहे. यंदा दहावीला दीड लाखांहून अधिक विद्यार्थी बसले आहेत. महाराष्ट्र शिक्षण बोर्डाच्या www.mahresult.nic.in आणि www.msbshse.ahc.in या वेबसाइटवर निकाल पाहायला मिळणार आहे.