निर्भीड न्यूज –
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने पिंपरी येथील खराळवाडीतील पिंपरी चिंचवड महापलिका दवाखाना बालभवन येथे बुधवारी दि.8 जून रोजी दुपारी 12 ते 5 या वेळेत मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
सामाजिक कार्यकर्ते धुराजी शिंदे यांच्या वतीने सर्व रोग निदान शिबिराचे अयोजन करण्यात आले आहे.
या आरोग्य शिबिराचे उद्घाटन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कामिटीचे शहर अध्यक्ष सचिन साठे यांच्या हस्ते होणार आहे. माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक कैलास कदम, पश्चिम महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटीचे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष नदीम मुजावर, नगरसेवक सद्गुरू कदम, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कामिटीचे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष शहाबुद्धीन एम. शेख. पर्यावरण समितीचे अशोक मोरे, पश्चिम महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटीचे अल्पसंख्याक विभागाचे उपाअध्यक्ष तारीक रिजवी, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कामिटीचे अल्पसंख्याक विभागाचे उपाअध्यक्ष रहीम सैयद, शहर उपाध्यक्ष संदीपन झोंबाडे आदि यावेळी उपस्थित राहणार आहेत.