जावली | मेढा
निर्भीडसत्ता न्यूज –
जावळी तालुक्यात आपल्या शाहिरीने लोकप्रियता मिळविलेल्या शाहीर श्याम रोकडे यांची कलर्स वाहिनीने दखल घेतली. जावळी भूषण ठरलेल्या रोकडे यांचा बुधवारी मेढा पंचायत समिती येथे नागरी सत्कार करण्यात आला.
गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, सुरेश माने, ज्येष्ठ विधिज्ञ सुरेंद्र जानराव, सुनील माने, ऍड उमेश गवळी, सामाजिक कार्यकर्ते कैलास बापू परिहार, सिद्धार्थ गायकवाड,ज्येष्ठ पत्रकार संजय माने,सामाजिक कार्यकर्ते कैलास बापू परिहार, सुभाष माने उपस्थित होते.
महाराष्ट्रचे महागायक आदर्श शिंदे यांच्याबरोबर शाहीर रोकडे याना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली, ही बाब जवलीकरासाठी भूषणावह अशी आहे, अशा भावना ज्येष्ठ विधिज्ञ सुनील माने यांनी व्यक्त केल्या. लवकरच त्यांचा सामाजिक संस्थेतर्फे सत्कार करण्यात येणार आहे असे कैलास परिहार यांनी संगीतले
सत्काराला उत्तर देताना शाहीर रोकडे म्हणाले, हा माझा कुटुंबातील सन्मान आहे. लोककला जपण्याचे काम शाहिरीच्या माध्यमातून करत आहे. खेडोपाध्यात जाऊन शाहिरी कला सादर करायची, समाजाचे प्रबोधन करायचे, या उद्देशाने अनेक वर्ष शाहिरी करतो आहे. मुंबई विद्यापिठाच्या कला विभागात लोककला विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी व्याख्याता म्हणून जात होतो. त्यांच्या माध्यमातून कलर्स वाहिनीवरील कार्यक्रमासाठी निवड झाली. छक्कड प्रकारातील लोककला याचे सादरीकरण केले जात आहे, अनेकांनी माझे कौतुक केले. आतापर्यंतच्या कामाचे कौतुक झाले, आनंद वाटतो.