निर्भीडसत्ता न्यूज –
अखिल भारतीय मास्टर्स अॅथलेटिक्स स्पर्धेत एच. ए. कॉलनी, पिंपरी येथील पौर्णिमा जाधव यांनी लांब उडी प्रकारात 50 वर्षांखालील महिलाच्या गटात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक जिंकले.
स्पर्धा नाशिक येथे नुकतीच झाली. जाधव यांनी 6.20 मीटर अंतर उडी मारत ही कामगिरी केली. तसेच, 4 बाय 400 मीटर रिले स्पर्धेत सांघिक कांस्यपदक जिंकले. त्यांनी मलेशिया येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स अॅथलेटिक्स स्पर्धेत तिहेरी उडीत दुसर्या क्रमांक मिळवीत रौप्यपदक जिंकले होते.