निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपळे गुरव गावठाण येथे सुरू असलेल्या मंदिराच्या सभामंडपाचा स्लॅब कोसळल्याने तिघेजण मृत्यूमुखी पडले तर, सातजण जखमी झाले. जखमी कामगारांना औंध येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याचे समजताच राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक नाना काटे यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमी बांधकाम कामगारांची विचारपूस करून संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना चांगल्या पद्धतीचे उपचार करण्याच्या सूचना दिल्या. तसेच संबंधित कामगारांच्या कुटुंबियांची विचारपूस केली.
पिंपळे गुरव येथील स्मशानभूमीजवळ महादेव मंदिराच्या सभामंडपाचे काम सुरु असनाना सभामंडप कोसळला. ही घटना आज बुधवारी दुपारी अडीच वाजता घडली. यामध्ये तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर सातजण जखमी झाले आहे.
राष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे यांनी जखमींची विचारपूस करुन संबंधित वैद्यकीय अधिका-यांना उपचार चांगल्या पध्दतीने करण्याच्या सूचनाही दिल्या.