निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निकचे (पीसीपी) वार्षिक स्नेहसंमेलन तरुणाईच्या उत्साही वातावरणात संपन्न झाले. या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन पीसीईटीचे विश्वस्त भाईजान काझी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य व्ही.एस. ब्यॅकोड, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. एम.एस. वाखारे, क्रिडा विभाग प्रमुख एस.एस. कदेरे, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
काझी यांच्या हस्ते ‘वेब 2019’ या वार्षिक स्मरणिकेचे प्रकाशन, विविध क्रिडा स्पर्धांमध्ये नैपुण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थी, विद्यार्थिनींनी एकत्रित समुह नृत्य, नाटिका, पारंपारिक गाणी सादर केली.