अभिनेत्री रिंकू राजगुरु हिची प्रमुख भूमिका असलेला सिनेमाचा Official Teaser नुकताच लॉन्च झाला. ‘सैराट’चित्रपटात रिंकू राजगुरु हिने साकारलेली आर्ची चांगली भाव खाऊन गेली. कागर सिनेमाच्या माध्यमातून रिकू राजगुरु पुन्हा एकदा चाहते आणि प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा सिनेमा येत्या एप्रिलपासून चित्रपटगृहात झळकणार आहे.
दरम्यान, कागर सिनेमाचे पोस्टरही नुकतेच प्रदर्शित झाले होते. ‘तळपत्या उन्हात झळाळून निघणार. तिच्या स्वप्नांचा गुलाल उधळणार. जुना जाणार तेव्हाच नवा येणार…’कागर’, अशा पंचलाईनमध्ये रिकूच्या कागरचे पोस्टर झळले होते.