काळेवाडी : राक्षसरुपी अफजलखानचा अंत छत्रपती शिवाजी महाराजांनी केला तो दिवस ‘शिवप्रताप दिन’ म्हणून सातासमुद्रापार साजरा केला जातो. त्या दिवशी शहरातील महत्वाचे चौक तसेच सार्वजनिक ठिकानी शिवभक्तानी अफजलखानच्या वधाचे ‘छायाचित्र’ प्रदर्शित करावे, असे आवाहन शिव व्याख्याते मिलिंद एकबोटे यांनी काळेवाडी येथे केले. यावेळी एकबोटे यांनी आपल्या नेहमीच्याच शैलीत आक्रमक व्याख्यान देत हरेश नखाते यांच्या कार्याचे देखील त्यांनी यावेळी कौतुक केले.
अखिल काळेवाडी शिवजयंती उत्सवानिमित्त काळेवाडी, येथे शिवसेनेचे हरेश नखाते यांनी मिलिंद एकबोटे यांचे व्याख्यान आयोजन केले होते.
यावेळी एकबोटे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोचा वापर नुसता राजकीय परिपत्रकावर छापण्यापुरताच मर्यादित टेवू नका, तर त्यांचा इतिहास जगासमोर मांडा. त्यांचा आदर्श समोर ठेऊन हिदुत्व जोपासण्याचे कार्य करा असे सांगत एकबोटे यांनी महाराजांच्या कार्याचा आढावा नागरिकांसमोर मांडला. त्यांच्या प्रत्येक वाक्याला उपस्थितांमधून टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळत होता.
यावेळी देवा (अप्पा) नखाते, काशिनाथ नखाते, विकास एकशिंगे, एकनाथ मांजाळ, हनुमंत पिसाळ, विनोद तापकीर, चंद्रकांत गायकवाड, बाळा कासार, गणेश वायभट, अनिल पालांडे, अंकुश कोळेकर, प्रदीप दळवी, बाळासाहेब सिरसाट, बजरंग नढे, बाळासाहेब येडे, गणेश कुडूंबळे, गोविंद वलेकर,लक्ष्मण टोणपे, कृष्णा निकम, अविनाश कदम, नांगरे साहेब, गोरख पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी शिवभक्तानी शिववंदना घेतली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी एच. एन ग्रुप व साम्राज्य प्रतिष्ठाणच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.