बॉलिवूडमधील ग्लॅमरस गर्ल म्हणून ओळखली जाणारी मलायका अरोरा वर नेहमीच आपल्या तोकड्या कपड्यांमुळे चर्चेत असते. तोकड्या कपड्यात झळकताना तिचा सेक्सी अंदाज नेहमीच तिच्या चाहत्यांना भुरळ पाडत असतो. यावेळी मात्र तिने सगळ्यांनाच धक्का दिलाय.
अरबाज खानसोबत झालेल्या घटस्फोटानंतर मलायका अर्जुन कपूरच्या प्रेमात पडली आहे. अर्जुन कपूर आणि मलायका या दोघांचे फोटो अधूनमधून व्हायरल होत असतात. बऱ्याच दिवसानंतर मलायका एकटी दिसल्याने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. कोचीमध्ये सोमवारी झालेल्या कार्यक्रमातून परतताना मुंबई विमानतळावर मलायकाचे हे रूप पहायला मिळाले.