निर्भीडसत्ता न्यूज –
राज्यात निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या २१ ऑक्टोबर रोजी राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. राज्यात शिवसेना-भाजप युती होईल की नाही याची अद्यापपर्यंत स्पष्टता नसली तरी, पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने पूर्वीपासूनच पक्ष संघटन व बूथ लेवलला कार्यकर्त्यांची फळी मजबूत केली आहे. भोसरी-खेड मतदारसंघातील शिवसेना सहसंपर्क प्रमुख इरफान सय्यद यांनी भोसरी मतदारसंघातील शिवसैनिकांमध्ये आधीपासूनच नवचैतन्य जागृत करून, मतदारसंघातील आखाड्यात रणशिंग फुंकले आहे. सय्यद यांनी संवाद सभा, सदस्य नोंदणी व इतर माध्यमातून भोसरी मतदारसंघातील पदाधिकारी, शिवसैनिक यांना मतदारसंघात भगवा फडकावण्यासाठी या आधीपासूनच निवडणुकीच्या तयारीस लावले आहे. त्याच अनुषंगाने उद्या सोमवार (दि. २३) रोजी शिवसेना भोसरी विधानसभा इच्छुक उमेदवार इरफान सय्यद यांच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे.
शिवसेना भोसरी विधानसभेच्या वतीने रविवार (दि. २२) रोजी विधानसभा निवडणूक आढावा तसेच नियोजनसाठी भोसरीतील शिवसेना उपनेते तथा संपर्कप्रमुख शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या संपर्क कार्यालयात पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीस जिल्हा संघटिका सुलभाताई उबाळे, सहसंपर्क प्रमुख इरफानभाई सय्यद, उपजिल्हा प्रमुख निलेशजी मुटके, विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, उपशहर प्रमुख आबा लांडगे, नेताजी काशीद, महिला आघाडी उपशहर प्रमुख स्मिताताई जगदाळे, शहर संघटिका आशाताई भालेकर, संघटक अनील सोमवंशी, सर्जेरावजी भोसले, समन्वयक परशुराम आल्हाट, राहुल गवळी, एकनाथ कदम, विभागप्रमुख कृष्णा वाळके, योगेश जगताप, अनिल दुराफे, विश्वनाथ टेमगिरे, संजय गाढवे, सुखदेव नरळे, वसंत भोसले, प्रदीप चव्हाण, राजू भुजबळ, प्रदीप सपकाळ, सतीश दिसले, युवा सेनेचे सूरज लांडगे, रूपेश कदम, सचिन सानप, कुणाल तापकिर, सुनील समगर, अमित शिंदे, किशोर शिंदे तसेच सर्व प्रभागातील उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख दिपक सोनवणे, शिवाजी शेळके, काळू शिंदे, विठल लबड़े, उपशाखा प्रमुख व जेष्ठ शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सहसंपर्क प्रमुख इरफान सय्यद म्हणाले की, विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीची अद्याप घोषणा झाली नसली, तरी प्रचाराची रणनिती ठरवण्यात येत आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेलाच सुटावा यासाठी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीत पक्षप्रमुखांकडून प्रचाराचा धुरळा उडवून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवसैनिकांचीही उत्कंठा शिगेला पोहचली आहे. या अनुषंगाने उद्या सोमवार (दि. २३) रोजी सकाळी 10:30 वाजता प्रचाराला सुरुवात केली जाणार आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघातील रुपीनगर येथे शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा भोसरी विधानसभा इच्छुक उमेदवार इरफान सय्यद यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार आहे. यावेळी भोसरी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, शिवसैनिक, शाखा प्रमुख व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.