निर्भीडसत्ता न्यूज –
तळेगावात आज (शुक्रवारी) सर्वत्र एकाच चर्चा आहे, ती म्हणजे ‘सुनिल शेळकेंचीच’! त्यांची आज तळेगाव शहरातून प्रचारफेरी निघाली. या फेरीत सामील होण्यासाठी ना भाडोत्री गर्दी जमा केली होती, ना धाक-दपटशाने कुणाला आणलेलं होतं. सुनिल शेळकेंना आपला पाठिंबा जाहीर करण्यासाठी तळेगावकर स्वयंस्फूर्तीने या झाले होते. त्यातही महिलांची लक्षणीय उपस्थिती म्हणावी लागेल.
तळेगावात सकाळपासून विविध भागातून शेळके यांची प्रचारफेरी सुरु झाली होती. सकाळच्या सत्रात पंचवटी कॉलनी, राव कॉलनी, मस्करणीस कॉलनी, काळोखेवाडी, श्री नगरी, लक्ष्मीबाग कॉलनी, ज्ञानेश्वरनगर आदी भागातून तर सायंकाळच्या सत्रात जिजामाता चौक, शाळा चौक, गणपती चौक, सानेआळी, राजेंद्र चौक आदी भागातून ही प्रचार फेरी निघाली. नागरिक या फेरीत स्वतःहून सामील होऊन शेळके यांना समर्थन देत होते. यातही महिलांची प्रचंड प्रमाणावर उपस्थिती हेच या फेरीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. लहान मुलांचीही मोठी गर्दी यावेळी दिसून आली.