निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील पुनावळे, वाल्हेकरवाडी, रावेत, चिखली, बोर्हाडेवाडी, थेरगाव या सहा भागांत प्रथम नगर रचना योजना (टीपी स्किम) राबविण्यात येणार आहे. उर्वरित किवळे, ताथवडे, मामुर्डी तसेच, पिंपरी, पिंपळे सौदागर, चिंचवड आणि वाकड या सात भागांत नंतर ही योजना राबविली जाणार आहे.
शहरातील एकूण 14 भागांत टीपी स्किम राबविण्याचा आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या प्रस्तावाला पालिका सर्वसाधारण सभेने 6 जूनच्या सभेत मंजुरी दिली. प्रस्तावात थेरगाव, चिखली, चिंचवड, चर्होली, रावेत, किवळे, पुनावळे, ताथवडे, मामुर्डी, डुडुळगाव, मोशी, बोर्हाडेवाडी या 13 भागांत डीपी स्किम राबविण्याचा प्रस्ताव होता. पालिका सभेत डुडुळगाव, मोशी, चर्होली हे 3 विभाग वगळण्यात आले. तर, नव्याने पिंपरी, पिंपळे सौदागार, चिंचवड, वाकड या 4 भागांचा समावेश केला आहे.
त्यातील सहा भागांचा प्रथम टप्प्यात टीपी स्किमद्वारे नियोजन करण्यात येणार आहे. टीपी स्किमचा आराखडा अहमदाबादच्या एचसीपी कन्स्टलंट ही एजन्सी करीत आहे. या एजन्सीने नगरसेवकांसमोर 27 नोव्हेंबर 2018 ला सादरीकरण केले होते. एजन्सीने शहरातील वरील भागांचा प्राथमिक आराखडा तयार केला आहे. ही योजना प्रत्यक्षात राबवून, टीपी स्किम तयार करणे, राज्य शासनाकडे प्रारूप टीपी स्किम सादर करणे, तो प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना मागविणे आदी कामास आयुक्त हर्डीकर यांनी मंजुरी दिली आहे.
वरील सहा भागांतील टीपी स्किमचा अंतर्भूत क्षेत्र व चतु:सिमा दर्शक नकाशाची प्रत पालिका भवनातील तळमजल्यावरील नगररचना विभागातील कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध आहे. तसेच, पालिकेच्या ुुु.लिालळपवळर.र्सेीं.ळप या संकेतस्थळावरही पाहता येणार आहे, असे आवाहन आयुक्त हर्डीकर यांनी केले आहे. दरम्यान, या शहराच्या मंजुर विकास (डीपी) योजनेतील नकाशात गुलाबी रंगात किनारीने दर्शविलेले 6 भागांतील क्षेत्राचा समावेश टीपी स्किममध्ये केला आहे.
एकूण 1 हजार 157 हेक्टर जागेत टीपी स्किम
टीपी स्किम पुढील भागांचा विकास केला जाणार आहे. पुनावळे भागात 444 हेक्टर, वाल्हेकरवाडीमध्ये 197 हेक्टर, रावेतमध्ये 129 हेक्टर, चिखलीत 126 हेक्टर, बोर्हाडेवाडीत 223 हेक्टर, थेरगावमध्ये थेरगाव 36 हेक्टर भा