निर्भीडसत्ता न्यूज –
1 जानेवारी 1848 रोजी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले दाम्पत्याने पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्यामुळे 1 जानेवारी हा दिवस फुले दाम्पत्य सन्मान दिन म्हणून साजरा केला जातो.
तर 3 जानेवारी रोजी सावित्रीबाईंची 189 वी जयंती आहे. या दोन्ही दिवसांचे औचित्य साधून डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्सच्या 189 विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुलेंची वेशभूषा करुन लॅपटॉप, मोबाईल, हेडफोन अशा आधुनिक शिक्षण साहित्यांचा उपयोग करिय सावित्रीबाईंना आगळी-वेगळी आदरांजली अर्पण केली.