निर्भीड सत्ता न्यूज
जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्ध येथे सुरूअसलेल्या मौन आंदोलनाच्या समर्थनार्थ जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे ग्रामस्थांनी कँडल मार्च काढला. निर्भया खटल्यातील आरोपींना तात्काळ शिक्षा व्हावी, महिला अत्याचार संबंधी खटले जलदगती न्यायालयात चालवावे, न्यायालय व पोलीस विभागातील रिक्त जागांची त्वरित भरती करावी, तसेच न्यायालयीन मानकांचे उत्तरदायित्व बिल 2010 त्वरित पास करावे. यासाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगण सिध्दी येथे मौन आंदोलन सुरू केले आहे.
अण्णांच्या या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. या आंदोलनास पाठिंबा व समर्थनार्थ पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे समस्त ग्रामस्थांच्या वतीने शांततेत कँडल मार्च काढण्यात आला. यामध्ये तरुण तरुणीचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. तर महागणपती समोर कँडल लावून समर्थन रॅलीचा समारोप करण्यात आला.