निर्भीडसत्ता न्यूज –
स्वच्छ भारत सर्वेक्षणात पिंपरी-चिंचवड शहराची पाहणी केंद्रीय पथकातर्फे करण्यात आली आहे. या सर्वेक्षणाचा निकाल फेबु्रवारी महिन्यात लागण्याची शक्यता आहे.
स्वच्छ सर्वेक्षणात हागणदारी मुक्त शहर या ‘स्टार रेटींग’साठी 6 जणांचे पथक दोन दिवस शहरात होते. त्यांनी शहरातील विविध भागांत विशेषत झोपडपट्टी व एमआयडीसी भागात पाहणी करून प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधला.
त्यानंतर 13 सदस्यांचे पथकाने 4 दिवस शहरात थांबून पाहणी केली. पथकाने ‘क’ आणि ‘ई’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील सार्वजनिक शौचालयाची सर्वांधिक संख्येने पाहणी केली. तसेच, मोशी कचरा डेपोतील कचरा विल्हेवाट लावण्यासाठी सुरू असलेल्या विविध प्रकल्पाची माहिती घेतली.
शहरातील विविध 32 निवासी ठिकाणे तपासली. पदपथ, मैला सांडपाणी शुद्धकरण केंद्र, रस्ते, रेल्वे स्थानक, मंडई आणि बाजारपेठा परिसरात त्यांनी पाहणी केली. प्रत्येक ठिकाणी नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवून घेण्यात आल्या.