पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली येथे टाऊन हॉल बांधण्यात येत आहे. त्यासाठी 25 कोटी 45 लाख खर्चासह शहरातील विविध कामांसाठी येणार्या एकूण 117 कोटी 53 लाख खर्चास स्थायी समितीने मंजुरी दिली.
सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होते. चिखली येथे टाऊन हॉल बांधण्यासाठी समितीने मंजुरी दिली. शहरातील पवना, इंद्रायणी व मुळा नद्यांच्या पात्रातील जलपर्णी काढण्याचे काम 2 कोटी 30 लाख दराने मुंबईच्या साई फ्राईट प्रा. लि. ला देण्यास मान्यता देण्यात आली.
सांगवीतील रस्ते अत्याधुनिक पद्धतीने विकसित करण्यासाठी 8 कोटी 31 लाख, बोपखेल-दिघी प्रभाग चारमध्ये मध्ये बहुउद्देशीय हॉल बांधण्यासाठी 3 कोटी 23 लाख खर्चास समितीने मंजुरी दिली. जाधववाडीतील गट क्रमांक 539 विकसित करण्यासाठी 11 कोटी 96 लाख खर्चास मान्यता देण्यात आली.शिक्षण विभागाच्या बालवाड्यांसाठी स्कूल डेस्क खरेदीसाठी 1 कोटी 86 लाख खर्चास मान्यता देण्यात आली. स्वच्छ भारत अभियानातील स्वच्छ सर्वेक्षणाच्या नागरीकांमध्ये जनजागृती, माहिती व प्रसार करण्यासाठी 1 कोटी 53 लाख खर्चास मान्यता देण्यात आली.
थेरगाव व चिंचवड येथील तालेरा रूग्णालय इमारतीसाठी आवश्यक त्या क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी 3 कोटी 67 लाख खर्चास मान्यता देण्यात आली.
आरोग्य विभागास आवश्यक औषध खरेदीसाठी 28 लाख खर्चास मान्यता देण्यात आली. क्रीडा विभागास विविध व्यायाम शाळांकरीता आवश्यक विविध व्यायामशाळा साहित्य खरेदीसाठी 1 कोटी 21 लाख खर्चास मान्यता देण्यात आली. भोसरीतील आळंदी रस्ता सुशोभिकरण करण्यासाठी 64 लाख खर्चास मान्यता देण्यात आली.
‘क’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणार्या नाल्यातील अस्तित्वात असलेली ड्रेनेज लाईन रस्त्यावर स्थलांतरित करण्यासाठी 76 लाख खर्चास मान्यता देण्यात आली. प्रभाग क्रमांक आठमधील ड्रेनेज लाईन नलिका टाकणे व दुरूस्ती करण्यासाठी 91 लाख खर्चास मान्यता देण्यात आली.शिव शाहू शंभो उद्यानातील मोकळ्या जागेत जिम्नेशियम हॉल बांधण्यासाठी 2 कोटी 39 लाख खर्चास मान्यता देण्यात आली.