- कोरोनामुळे पिंपरी, नेहरूनगर, आंबेगाव येथील तिघांचा मृत्यू
पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
कोरोनामुळे डिलक्स चौक, पिंपरी येथील 55 वर्षीय महिलेचा, नेहरूनगर, भोसरी रोड येथील 39 वर्षीय पुरूषाचा आणि घोडेगाव, आंबेगाव येथील 78 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांचा गुरूवारी (दि.25) वायसीएम रूग्णालयात मृत्यू झाला. तर, शहरात आज 134 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले.
पॉझिटिव्ह आढळलेले रूग्ण हे नवभारतनगर, सिद्धार्थनगर, जाधव चाळ, दापोडी, व्यंकटेश पार्क, थेरगाव, अजंठानगर, इंदिरानगर, कासारवाडी, विठ्ठलनगर, समर्थनगर, नवी सांगवी, विवेकनगर, आकुर्डी, नूर मोहला दिघी, लांडेवाडी, मिलिंदनगर, तापकीरनगर, हनुमान मंदिर, रूपीनगर, अजमेरा कॉलनी, मोरवाडी, सुखवानी कॅम्पस, पिंपरी, पिंपरी कॉनली, मोहनगर, सिद्धार्थनगर, भोसरी, संभाजीनगर, दिघीनगर, भोसरी, साईबाबानगर, कोकणेनगर, धावडेवस्ती, दिघी, बिजलीनगर, ताम्हाणेवस्ती, आदर्शनगर, काळेवाडी, पवारनगर, सांगवी, ज्योतिबानगर, पाटीलनगर, चिखली, कासारवाडी, दत्त मंदिर, वाकड, नखातेवनगर, अशोक थियटर, गुजननगर, संत तुकारामनगर, विश्वशांती कॉलनी, पिंपळे सौदागर, बौद्धनगर, मोरेवस्ती, विकासनगर, रामनगर, रहाटणी, भारतमातानगर, गांधीनगर, शांतीनगर, केशवनगर, गुरूद्वारा रस्ता, आकुर्डी, वाल्हेकरवाडी, आनंदनगर, तानाजीनगर, कस्पटेवस्ती, पूर्णानगर, अष्टविनायक नगर, काळेवाडी, मोरया पार्क, पिंपळे गुरव, गुळवे वस्ती, भोई आळी, चिंचवड, पंचशील नगर, पिंपळे निलख, पाटोळे चाळ, प्रभातनगर, पिंपळे गुरव, शिवगणेश कॉलनी, दिघी तसेच, केसरीनगर, पुणे, तळेगाव, कोंढवा, कोथरूड, विजयनगर, पुणे येथील रहिवाशी आहेत.
कोरोनाबाधितांची एकूण संख्या 2 हजार 329 झाली आहे. तर, वायसीएम, भोसरी व इतर रूग्णालयात 896 रूग्णांवर आणि पुण्यात एका रूग्णावर उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 65 झाली आहे.