पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आटोक्यात यावी म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेने 14 ते 18 जुलै असा 5 दिवस कडक लॉकडाऊन लागू केला होता. त्या काळातही मास्क न लावल्याबद्दल आणि रस्त्यावर थुंकल्याप्रकरणी 446 बेशिस्त नागरिकांवर आरोग्य विभागाने कारवाई केली आहे. त्यांच्याकडून एकूण 1 लाख 31 हजार 300 रूपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
पालिकेने 14 ते 23 जुलै असा दहा दिवसाचा लॉकडाऊन लागू केला आहे. त्यातील 14 ते 18 जुलै हे 5 दिवस कडक लॉकडाऊन म्हणून पाळण्यात आला. नागरिकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. मात्र, काही बेशिस्त नागरिकांनी घराबाहेर पडून नियमांकडे दुर्लक्ष केले. तोंडाला मास्क न लावता फिरणार्या एकूण 184 जणांना प्रत्येकी 500 रूपयांचा दंड करण्यात आला. एकूण 92 हजारांचा दंड 5 दिवसांत जमा करण्यात आला. रस्त्यांवर थुंकणार्या 262 जणांना प्रत्येकी 150 रूपयाप्रमाणे एकूण 39 हजार 300 रूपयांचा दंड आकारण्यात आला. पाच दिवसांच्या कालावधीत 446 जणांकडून 1 लाख 31 हजार 300 रूपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.