पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अखिल सार्वजनिक शिवजयंती उत्सव मोहननगर रामनगर चिंचवड स्टेशन काळभोरनगर यांच्या वतीने स्टार हॉस्पिटल व स्वास्थ मेडीकल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले. चिंचवड, मोहननगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली.
शिवसेना सहसंपर्कप्रमुख व कामगार नेते इरफान सय्यद, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, मनसे उपाध्यक्ष दत्ता देवतरासे, सामाजिक कार्यकर्ते गणेश लंगोटे, संजय जगताप, गणेश दातीर-पाटील, संदिप बामणे, राहुल दातीर-पाटील, कामगार नेते किरण देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे विशाल काळभोर, शिवसेना महिलाप्रमुख माधुरी पाटील, शिवसेना विभागप्रमुख सोमनाथ अलंकार, सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर, सुदेश चव्हाण, अविनाश गायकवाड, मंगेश थोरात, अभिजित वेंगुर्लेकर, सुरज मिर्गे, सुरज कावळे व परिसरातील महिला, युवक उपस्थित होते.
दरम्यान, स्टार हॉस्पिटलच्या सौजन्याने घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिराचा लाभ आरोग्य कर्मचारी तसेच परिसरातील लोकांनी घेतला. यात १०० लोकांची तपासणी करण्यात आली.