पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. एका दिवसात तब्बल 1 हजार 248 कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची नोंद बुधवारी (दि.17) झाली आहे. शहरातील सर्व 8 क्षेत्रीय कार्यालय हद्दीत आज 100 पेक्षा अधिक बाधित रूग्ण सापडल्याची नोंद आहे. सर्वांधिक प्रत्येकी 197 रूग्ण ‘अ’ व ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय परिसरात आढळून आले आहेत. ‘ब’ क्षेत्रीय भागात 169, ‘क’ क्षेत्रीय परिसरात 168, ‘ई क्षेत्रीय परिसरात 142, ‘ग’ क्षेत्रीय भागात 140, ‘फ’ क्षेत्रीय परिसरात 126 आणि ‘ह’ क्षेत्रीय हद्दीत 109 रूग्णांची नोंद झाली आहे.सद्यस्थितीत शहरात 7 हजार 912 बाधित रूग्ण आहेत. त्यापैकी 1 हजार 749 रूग्ण रूग्णालयात दाखल असून, 6 हजार 163 रूग्ण घरीच राहून उपचार घेत आहेत.
शहरात 752 मायक्रो कंन्टेमेंट झोन तर, 145 ठिकाणी मेजर कंटेमेंट झोन तयार करण्यात आले आहेत. उपचारादरम्यान, पिंपरी, पिंपळे निलख व फुगेवाडीतील 3 रूग्णांचा मृत्यू झाला.आज सर्वांधिक 6 हजार 930 जणांचे स्वॅब घेण्यात आले. तर, 5 हजार 472 अहवाल निगेटिव्ह आले. बाधित 615 रूग्ण आज बरे झाले. बरे झालेल्यांची एकूण संख्या 1 लाख 7 हजार 96 इतकी आहे.