निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या परिसरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय वाढत आहेत. सद्य परिस्थितीत रुग्णांना उपचारासाठी आपल्या महापालिकेचे वाय.सी.एम., जिजामाता हॉस्पिटल, भोसरीचे कोविड हॉस्पिटल या हॉस्पिटलमध्ये एकही बेड शिल्लक नाही. अशीच परिस्थिती राहिली तर खासगी रुग्णालयात सुद्धा एकही बेड शिल्लक राहणार नाही. याकरिता पालिका प्रशासनाकडून महापालिकेचे चिखली येथील घरकुल वसाहतीमध्ये उभारलेले कोविड सेंटर पुन्हा सुरू करावे अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या शहरात मागील दोन दिवसापासून १३०० च्या जवळपास कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. आज पिंपरी चिंचवड महापालिका रुग्णालयात १८८६ तर गृह विलगीकरण ६९११ सक्रिय रुग्ण आहेत. कोरोना परिस्थितीचे गांभीर्य ओळखून परिस्थिती हाताबाहेर जाण्याअगोदर पिंपरी चिंचवड महापालिकेचे ताब्यात असलेल्या चिखली येथील घरकुल बिल्डींग मधील पूर्वी सुरू असणारे कोविड केअर सेंटर पूर्ववत सुरू करावे. तसेच कोरोना रुग्णासाठी खाजगी रुग्णालयात ५० टक्के बेड राखीव ठेवण्याचे आदेश काढावेत. अशी मागणी नाना काटे यांनी निवेदनात केली आहे.
वाढत्या कोरोना पार्श्वभूमीवर घरकुल वसाहतीमधील पालिकेचे कोविड सेंटर पूर्ववत सुरू करा : नाना काटे यांची मागणी पिंपरी, १९ मार्च पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या परिसरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय वाढत आहेत. सद्य परिस्थितीत रुग्णांना उपचारासाठी आपल्या महापालिकेचे वाय.सी.एम., जिजामाता हॉस्पिटल, भोसरीचे कोविड हॉस्पिटल या हॉस्पिटलमध्ये एकही बेड शिल्लक नाही. अशीच परिस्थिती राहिली तर खासगी रुग्णालयात सुद्धा एकही बेड शिल्लक राहणार नाही. याकरिता पालिका प्रशासनाकडून महापालिकेचे चिखली येथील घरकुल वसाहतीमध्ये उभारलेले कोविड सेंटर पुन्हा सुरू करावे अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सध्या शहरात मागील दोन दिवसापासून १३०० च्या जवळपास कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. आज पिंपरी चिंचवड महापालिका रुग्णालयात १८८६ तर गृह विलगीकरण ६९११ सक्रिय रुग्ण आहेत. कोरोना परिस्थितीचे गांभीर्य ओळखून परिस्थिती हाताबाहेर जाण्याअगोदर पिंपरी चिंचवड महापालिकेचे ताब्यात असलेल्या चिखली येथील घरकुल बिल्डींग मधील पूर्वी सुरू असणारे कोविड केअर सेंटर पूर्ववत सुरू करावे. तसेच कोरोना रुग्णासाठी खाजगी रुग्णालयात ५० टक्के बेड राखीव ठेवण्याचे आदेश काढावेत. अशी मागणी नाना काटे यांनी निवेदनात केली आहे. करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पालिकेने कोविड केअर सेंटर (सीसीसी) चालविण्यासाठी खासगी संस्थांना देण्याचा निर्णय घेतला होता. यात पालिकेने कोविड सेंटरचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या सेंटरमध्ये करोना पॉझिटिव्ह पण सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार केले जात होते. यामुळे पालिकेच्या रुग्णालयावरील ताण कमी झाला होता. आजही ऑटो क्लस्टर येथे पालिकेकडून कोविड सेंटर सुरू आहे. त्याठिकाणी रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत अशा तक्रारी येत आहेत. त्यामुळे पालिकेने पर्यायी घरकुल वसाहतीमध्ये उभारलेले व सर्व यंत्रणा असलेले कोविड सेंटर पूर्ववत सुरू करावे असे म्हटले काटे यांनी म्हटले आहे.करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पालिकेने कोविड केअर सेंटर (सीसीसी) चालविण्यासाठी खासगी संस्थांना देण्याचा निर्णय घेतला होता. यात पालिकेने कोविड सेंटरचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या सेंटरमध्ये करोना पॉझिटिव्ह पण सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार केले जात होते. यामुळे पालिकेच्या रुग्णालयावरील ताण कमी झाला होता. आजही ऑटो क्लस्टर येथे पालिकेकडून कोविड सेंटर सुरू आहे. त्याठिकाणी रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत अशा तक्रारी येत आहेत. त्यामुळे पालिकेने पर्यायी घरकुल वसाहतीमध्ये उभारलेले व सर्व यंत्रणा असलेले कोविड सेंटर पूर्ववत सुरू करावे असे म्हटले काटे यांनी म्हटले आहे.