पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भारतीय संविधान दिन शुक्रवारी (दि.26) मोठ्या उत्साहता साजरा करण्यात आला. पालिका भवनात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस महापौर उषा ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के अनिल रॉय, डॉ. लक्ष्मण गोफणे, उपायुक्त आशादेवी दुरगुडे, सहायक आयुक्त अण्णा बोदडे, श्रीनिवास दांगट, वामन नेमाणे, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे उपस्थित होते.
पिंपरी चौकातील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास महापौर ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. संविधानाच्या प्रास्तविकेच्या कोनशिलेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी आमदार महेश लांडगे, उपमहापौर घुले, सत्तारुढ पक्षनेते ढाके, आयुक्त पाटील, नगरसेविका उषा मुंढे, नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन आदी उपस्थित होते. विरोधी पक्षनेते राजू मिसाळ व शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. विविध संघटनेतर्फे डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. तसेच, पिंपरी चौकात सन्मान संविधानाचा, भीम गीतांचा कार्यक्रम घेण्यात आले. भाजपच्या वतीने शहरभरात शंभरहुन अधिक ठिकाणी सामूहिक संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.