- थेरगवा येथील घटनेमुळे चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीस गालबोट
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चिंचवडला रॅली सुरू असतानाचा प्रकार
पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख व माजी नगरसेवक अॅड. सचिन भोसले यांच्यावर बुधवारी (दि.22) सायंकाळी थेरगाव येथे काही तरूणांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात ते जखमी झाले असून, त्यांना बाणेर येथील खासगी रूग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकारामुळे चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीस गालबोट लागले आहे. विशेष म्हणजे घटनास्थळापासून काही अंतरावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रॅली सुरू होती.
हा प्रकार थेरगाव मंगल नगर येथील त्यांच्या थेरगावातील मंगल नगर येथील घराजवळ झाला. भोसले हे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ निघाले होते. समोरून येऊन काही तरूणांनी अचानक हल्ला केला. भोसले यांना खाली पाडून ब्लेडने वार करण्यात आले असून, पेव्हिंग ब्लॉकने मारहाण करण्यात आली. त्यात त्याचे कपडे फाटले. हल्ला करून ते तरूण पळून गेले. हा प्रकार पाहून तेथे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जखमी भोसले यांना कार्यकर्त्यांनी तात्काळ बाणेर येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. भोसले यांच्या तक्रारीवरून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.