पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
तृतीयपंथी लोकांना राहण्यासाठी घरकुल प्रकल्पात एक टक्का आरक्षण द्यावे. तृतीयपंथी लोकांना हक्काचे घर मिळून त्यांच्या घराचे स्वप्न पुर्ण होईल, अशी मागणी शिवसेना युवती मोर्चाच्या प्रदेश सदस्या शर्वरी गावंडे यांनी ट्रस्ट हेल्थ केअर संस्थेच्या माध्यमातून महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये शहरामध्ये मोठ्या प्रमाणात तृतीयपंथी समाज वास्तव्य करीत आहे. महापालिकेने प्राधिकरण, चिखली येथील घरकुल आवास योजना राबविली आहे. त्या प्रकल्पात तृतीयपंथी समाजाला कमीत-कमी एक टक्का तरी आरक्षण दिले जावे. त्यामुळे त्यांच्या राहण्याची सोय होऊ शकते, असे गावंडे यांनी निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, गेली अनेक दिवसापासून ट्रस्ट हेल्थ केअर संस्थेच्या माध्यमातून तृतीपंथीयांना न्याय मिळावा. तसेच त्यांना हक्काचे घर मिळावे, या साठी ट्रस्ट प्रयत्नशील आहे.
महापालिकेत तृतीय पंथीयांना नोकरी दयावी, म्हणून तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे मागणी केली होती. त्यास त्यांनी प्रतिसाद दिला होता. महापालिकेत अनेक तृतीयपंथी सन्मानाने काम करत आहेत. त्याच प्रमाणे त्याचा घराचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.