पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी महापालिकेचे सफाई कामगारांचे त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यासाठी सफाई कामगारांचे थेरगाव येथील नवीन थेरगाव रूग्णालयाशेजारील शंकरराव गावडे कामगार भवनात आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. त्यात 26 जणांना मधुमेह, 17 जणांना रक्तदाब आढळून आला.
सफाई मित्र सुरक्षा शिबिरात ब, ड, ग, ह क्षेत्रीय कार्यालयात काम करणार्या सफाई कामगारांची तपासणी सुमारे 751 सफाई कर्मचार्यांनी आरोग्य तपासणी करून घेतली. त्यातील 43 जणांची पुढील तपासणीसाठी रुग्णालयांसाठी शिफारस करण्यात आली. त्यामध्ये 26 कर्मचार्यांना मधुमेह तर, 17 कर्मचार्यांना रक्तदाबाची लक्षणे आढळली आहेत. तपासणीनंतर कर्मचार्यांना मोफत औषधे देण्यात आली.
उद्घाटन सहायक आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या हस्ते झाले. या वेळी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, क्षेत्रीय अधिकारी शीतल वाकडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी एम. एम. शिंदे, कुंडलीक दरवडे, सतिश पाटील, महेश आढाव, मुख्य आरोग्य निरीक्षक श्रीराम गायकवाड आदी उपस्थित होते. सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे यांनी प्रास्ताविक केले. प्रफुल्ल पुराणिक यांनी सुत्रसंचालन केले.
दरम्यान, त्यापूर्वी सर्वांनी स्वच्छता व आरोग्यविषयक शपथ घेतली. सोमवारी (दि.25) सकाळी 8 ला मासुळकर कॉलनी येथील डॉ. हेडगेवार क्रीडा संकुल येथे अ, क, इ, फ क्षेत्रीय कार्यालयातील सफाई कर्मचार्यांसाठी आरोग्य शिबिर आयोजित केले आहे.