पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
वृत्तसेवाराज्य शासनाकडून प्रतिनियुक्तीवर अहमदनगरचे जिल्हा नियोजन अधिकारी नीलेश भदाने यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत उपायुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यामुळे महापालिकेत 10 पैकी शासनाचे 6 उपायुक्त झाले आहेत.
त्यात विठ्ठल जोशी, सुभाष इंगळे, सुभाष चारठाणकर, रविकिरण घोडके, मिनीनाथ दंडवते व भदाने असे 6 उपायुक्त आहेत. तर, महापालिका आस्थापनेवरील मनोज लोणकर व संदीप खोत हे उपायुक्त आहेत.
अद्याप उपायुक्त भदाने यांच्याकडे कोणत्या विभागाची जबाबदारी देण्यात आलेली नाही. आयुक्त शेखर सिंह हे परदेश दौर्यावर आल्यानंतर त्यांना विभागाची जबाबदारी मिळणार आहे.