पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पुणे जिल्हा असोसिएशनच्या समरलिग स्पर्धेच्या टी -ट्वेंटी साखळी सामन्यात पिंपरी-चिंचवड महापालिका क्रिकेट संघाने सय्यद क्रिकेट अॅकॅडमी संघाचा 23 धावाने पराभव करून स्पर्धेमध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे.
महापालिका संघाने प्रथम फलंदाजी करून 15 षटकांमध्ये 7 बाद 132 धावा केले होते.
संघाच्या विक्की बंडवालने आक्रमक गतीने नाबाद 64 धावा केल्या. त्याला कर्णधार राहुल चावरिया यांने 32 धावाची खेळी करुन सुरेख साथ दिली. सय्यद अॅकॅडमीकडून सुनील अनारसे, रुद्र प्रकाश, संतोष पाखारे यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.
सय्यद अॅकॅडमीने 132 धावाचा पाठलाग करताना 15 षटकामध्ये केवळ 110 धावा केल्या. संतोष पाखरे यांनी 41 धावा केल्या. महापालिका संघाकडून संदीप शेळके याने भेदक गोलंदाजी करुन 3 बळी मिळवले. तर त्याला कृष्णा चव्हाण व राहुल चावरिया यांनी प्रत्येकी 1 बळी घेतले. सामन्यामधे नाबाद 64 धावाची आक्रमक फलंदाजी करुन विक्की बंडवाल याला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला.