पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम), नवीन थेरगाव, आकुर्डी, नवीन जिजामाता, नवीन भोसरी या पाच रुग्णालयांच्या परिसरात जेनेरीक औषधी दुकान सुरू करण्यात येणार आहेत. नॅकोफ इंडिया लिमिटेड या संस्थेला अमृत स्टोअर्सच्या धर्तीवर दुकाने सुरू करण्यास महापालिकेने थेट पद्धतीने भाडे तत्वावर जागा उपलब्ध करून देत आहे. त्या संस्थेला 150 ते 186 चौरस फूट क्षेत्रफळाचे पाच गाळे दरमहा 32 हजार 242 रूपये भाडे दराने 10 वर्षांसाठी देण्यात आले आहे. त्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंगळवारी (दि.30) स्थायी समितीची मान्यता दिली आहे.