निर्भीडसत्ता न्यूज –
शहरातील जेष्ठ नागरिकांना अचानक आरोग्याच्या समस्या उद्भवतात. अशा वेळी त्यांना तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. तसेच वेळेत वैद्यकीय उपचार देण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
एकनाथ पवार यांनी निवेदनात नमूद केले आहे की, जेष्ठ नागरिकांना शहरामध्ये फिरत असताना अचानक आरोग्याची समस्या उद्भवते. अशा वेळी त्यांना तातडीने वैद्यकीय सेवा मिळणे गरजेचे आहे. याबाबत नागरिकांना सारथी हेल्पलाईन व पोलिस यंत्रणा विभाग (क्र.१००) यांच्याशी सलग्न करुन दिल्यास कोणत्याही जेष्ठ नागरिकास अचानक त्रास उद्भवल्यास हेल्पलाईनद्वारे ताबडतोब वैद्यकीय सेवा देणे सुलभ होईल. याबाबत आयुक्तांनी जेष्ठांना वेळेत वैद्यकीय सेवा देण्यासाठी उपयायोजना करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.