निर्भीडसत्ता न्यूज –
भारतीय स्वतंत्रदिनाच्या निमित्ताने पिंपर-चिंचवड महापालिका व बॉम्बे इंजिनिरिंग ग्रुप खडकी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय लष्काराचे नो यूअर आर्मी हे प्रदर्शन व प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरीतील एच. ए. मैदानावार ११ व १२ ऑगस्ट २०१७ रोजी हे प्रदर्शन होणार आहे.
त्याचे उदघाटन शुक्रवारी (दि. ११) सकाळी दहा वाजता पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे असणार आहेत. भारतीय लष्कर युद्ध सामग्रीचे प्रदर्शन प्रथमच पिंपरी-चिंचवड शहरात आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये इन्फंटरी, आर्म्ड, इंजिनिअर्स, सिग्नल्स, एअर डिफेंन्स, मेकॅनाईजड आदीमध्ये वापरण्यात येणा-या यंत्रसामुग्री प्रेक्षकांना पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता भारतीय लष्कराचा बॅंड, विविध मार्शल आर्टस् यामध्ये महाराष्ट्रामधील मलखांब, पंजाबमधील गटका, दक्षिण आशियातील प्रसिद्ध असलेली काली कला, जिमनॅस्टिक्स, ब्रास बॅंड, बॉडी बिल्डींग आदींची प्रात्यक्षिके २०० लष्करी जवानांकडून सादर केली जाणार आहेत. तसेच,”नो युअर आर्मी” या लघुपटाचे सादरीकरण होणार आहे. पहिल्या दिवशी फक्त शालेय विद्यार्थ्यांना प्रदर्शन पाहता येणार असून दुसरा दिवस सर्वासांठी खुला असणार आहे.
या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना, युवकांना भारतीय सेनेमध्ये सामिल होण्याबाबतचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या प्रदर्शनास व प्रात्यक्षिक सादरीकरणास प्रवेश विनामुल्य असणार आहे. तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर नितीन काळजे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.