निर्भीड न्यूज –
श्रीराम सेवा ट्रस्ट व रहाटणी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीराम जन्मोत्सव अखंड हरिनाम संकीर्तन सोहळा आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. 8 एप्रिल रोजी या सोहळ्याला सुरुवात झाली. शुक्रवार, दि. 15 एप्रिलपर्यंत हा सोहळा सुरू राहणार आहे.
सोहळ्याचे हे 79 वे वर्ष असून यासाठी वारकरी सांप्रदायातील नामवंत कीर्तनकारांना सेवेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी महाआरती होणार आहे. मावळ लोकसभा खासदार श्रीरंग बारणे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, विलास लांडे, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष बाबासाहेब तापकीर, राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे (पाटील), राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विठ्ठल ऊर्फ नाना काटे, शिवसेनेचे पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख राहुल कलाटे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, कैलास थोपटे, विनोद नढे, प्रमोद ताम्हणकर, नगरसेविका शीतल काटे, अनिता तापकीर, विमल काळे, स्वाती कलाटे, नीता पाडाळे, माजी महापौर रंगनाथ फुगे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेता मच्छिंद्र तापकीर, दत्तात्रय वाघेरे, माजी नगरसेवक खंडू कोकणे, चंद्रकांत नखाते, सुरेश नढे (पाटील), संतोष कोकणे, माजी नगरसेविका ज्योती भारती, सविता नखाते, पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाच्या माजी उपसभापती सविता खुळे, महापालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाचे स्वीकृत सदस्य सागर कोकणे, माजी स्वीकृत सदस्य नवनाथ नढे (पाटील), राष्ट्रवादी काँग्रेस वारकरी सेलचे शहराध्यक्ष सखाराम नखाते, भानुमती काटे, अनिता मगर, पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघाचे माजी अध्यक्ष श्रीराम कोकणे आदी महाआरतीसाठी उपस्थित राहणार आहेत.
सोहळ्या दरम्यान दररोज पहाटे काकड आरती, सकाळी 10 वाजता संगीत गाथा पारायण, दुपारी 3 वाजता महिला भजन; तसेच सायंकाळी साडेपाच वाजता हरिपाठ, सात वाजता कीर्तन आणि रात्री 9 वाजता हरिजागर आदी कार्यक्रम होणार आहेत.
सोहळ्याच्या पहिल्या दिवशी शुक्रवार, दि. 8 एप्रिल रोजी हभप उत्तरेश्वर महाराज जाधव (वांगी संस्थान) यांचे कीर्तन झाले. शनिवारी हभप विलास महाराज वाघ, रविवारी हभप सतीश महाराज काळजे, सोमवारी हभप संदीप महाराज लोहोर, मंगळवारी हभप मारोती महाराज सुरवसे, बुधवारी हभप बापूराव महाराज तुपे, गुरुवारी हभप शिवाजी महाराज वाघ यांचे कीर्तन होणार आहे.
रामनवमीला शुक्रवार, दि. 15 एप्रिल रोजी हभप अशोक महाराज हुंबे यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. राम जन्म सोहळाही या वेळी साजरा करण्यात येणार आहे. काल्याचे कीर्तन आणि राम जन्म सोहळ्यानंतर महाप्रसादाचे वाटप होणार आहे. श्री जोगेश्वरी प्रासादिक दिंडी रहाटणी – काळेवाडी यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता श्रींची पालखी दिंडी मिरवणूक काढण्यात येणार आहे.