निर्भीड न्यूज –
काळेवाडी येथील सप्तश्रृंगी नागरी सहकारी पतसंस्थेचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष आहे. संस्थेचा 25 वा वर्धापनदिनानिमित्त रविवार, दि. 10 एप्रिल रोजी दुपारी साडेचार वाजता स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील सर्वसामान्य ठेवीदार आणि कर्जदारांचा विश्वास संपादन करण्यात ही पतसंस्था यशस्वी झाली आहे. वर्धापनदिनानिमित्त आयोजित स्नेहमेळाव्याला उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे चेअरमन सुरेश शिरुडे यांनी केले आहे.