निर्भीडसत्ता न्यूज –
स्वाईन फ्लूमुळे शहरातील एका खासगी रुग्णालयात ६१ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर, आणखी २४ रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हिंजवडी येथील ६१ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी (दि.८) या रुग्णाचा मृत्यू झाला. चालू वर्षी जानेवारीपासून आजअखेर शहरात ३२५ स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण आढळले आहेत. त्यामधून ४१ रुग्ण दगावले असून २७९ रुग्णांना उपचार करून बरे करण्यात यश आले आहे. तर, सध्या पिंपरी-चिंचवड शहरातील विविध रुग्णालयात २४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.