निर्भीडसत्ता न्यूज –
स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने पिंपरी-चिंचवड शहरात स्वाईन फ्लूमुळे आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चालू वर्षी जानेवारीपासून शहरात ४७ जणांचा स्वाईन फ्ल्यूमुळे मृत्यू झाला असून शहरात आणखी २७ जणांवर उपचार सुरू आहेत.
मंचर येथे राहणा-या ७३ वर्षीय रुग्णाचा उपचार सुरु असताना शुक्रवार (दि. १५) त्याचा मृत्यू झाला. जुन्नर येथील ५५ वर्षीय रुग्णाला स्वाईन फ्लूचा त्रास वाढल्याने मृत्यू झाला आहे. जानेवारीपासून आतापर्यंत शहरात 357 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, विविध रुग्णालयात २७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.