निर्भीडसत्ता न्यूज –
मागील वर्षभरापासून चर्चेत असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी विशाल वाकडकर यांची निवड झाली आहे. राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांनी वाकडकर यांच्या निवडीची शुक्रवारी (दि. २२) घोषणा केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत वाकडकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आहे. वाकडकर हे वाकड, हिंजवडी परिसरातील राष्ट्रवादीचे सक्रीय कार्यकर्ते आहेत. अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात त्यांचा पुढाकार असतो. त्यांच्या निवडीबद्दल शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी त्याचे अभिनंदन केले.