भाविकांनी केली भंडाऱ्याची २५ टनाची उधळण
हुपरी / प्रतिनिधी
निर्भीडसत्ता न्यूज –
कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली येथील श्री विठ्ठल-बिरदेवाच्या यात्रेस प्रारंभ झाला. चांगभलंच्या गजरात व भक्तीमय वातावरणात येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले जागृत देवस्थान श्री विठ्ठल बिरदेवाच्या यात्रेस मोठ्या उत्साहाने सुरुवात झाली. लाखो भाविकानी दर्शन घेतले. अथणी व ऐनापुरे परिसरातील मानकरी ढोल ताशांच्या गजराने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
प्रकाश पाटील, समस्त पुजारी धनगर समाजाचे गावडे, रणजित पाटील, विवेक भाणसे, अर्जुन ओमापुजारी, विठ्ठल गावडे, रोहन कुलकर्णी, तनवेश मगदूम, नंदकुमार जोशी, म्हालदार, चोपदार, श्री विठ्ठल बिरदेव देवस्थानचे पंच कमिटी आदीच्या उपस्थितीत मिरवणुक काढण्यात आली.
छत्री, निशाणी व नंदीसह पट्टणकोडोली नगरीत या भाविकांनी चालत येऊन विजापूर बादशहांचे मानाचे बाशिंग देवाच्या चरणी अर्पण केले. हा सोहळा पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, राजस्थान, गोवा, मध्यप्रदेश आदी राज्यातून लाखों भाविक उपस्थितीत होते. यात्रा पुढे चार दिवस सुरु राहणार आहे.
पट्टणकडोलीतील विठ्ठल-बिरदेव मंदिर हे महाराष्ट्रातील धार्मिक संस्कृतीचं प्रतिक मानलं जातं. तसेच महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, गोवा, राजस्थान आदी राज्यातील लाखो भाविकाचं विशेषत: धनगर बांधवाचे आराध्य दैवत म्हणून संबोधले जाते.विठ्ठल-बिरदेव मंदिर हे महाराष्ट्रातील धार्मिक संस्कृतीचं प्रतिक मानलं जातं. तसेच महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, गोवा, राजस्थान आदी राज्यातील लाखो भाविकाचं विशेषत: धनगर बांधवाचे आराध्य दैवत म्हणून संबोधले जाते.