दत्तवाड / प्रतिनिधी
निर्भीडसत्ता न्यूज –
दत्तवाड येथील श्रीमती अक्कताई नाना नेजे हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज मध्ये ‘वाचन प्रेरणा दिन’ आज (शुक्रवारी) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शाळेचे मुख्याध्यापक एस एम तावदारे, पर्यवेक्षक कोळी सर ज्युनिअर विभाग प्रमुख एस ए पाटील, कडाळे सर , मिसळ सर आर व्ही पाटील,शाळेतील शिक्षक व विद्यार्थी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पर्यवेक्षक कोळी सर यांनी प्रतिमेचे पूजन केले तसेच चव्हाण सर व मिसळ सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी अब्दुल कलाम यांची अनेक उदाहरणे व गोष्टी सांगितल्या त्यानंतर कु. संध्या पाटील दहावीतील विद्यार्थ्याने अब्दुल कलाम यांनी लिहलेल्या कवितेचे वाचन केले. पंकज लांडगे व गिरीश कुलकर्णी यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना पुस्तके भेट दिली.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन आर व्ही पाटील सर यांनी केले. आभार पर्यवेक्षक कोळी सर यांनी मानले.