कुरुंदवाड / संदीप सावगावे
निर्भीडसत्ता न्यूज –
शिरली तालुक्यातील सहकारभूषण एस. के.पाटील महाविद्यालयातील कनिष्ठ विभागातील खेळाडू प्रीतम शिवाजी चव्हाण याने १७ वर्षांखालील गटामध्ये तर प्रतिक सावंतने १९ वर्षांखालील गटामध्ये शालेय विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये अजिंक्यपद पटकावले आहे यामुळे या महाविद्यालयाने आपली विजयाची परंपरा कायम राखली आहे. तर यासीन कोटीवाले याने १९ वर्षांखालील विभागात उपविजेतेपद पटकावले.
ज्येष्ठ क्रीडा शिक्षक नाना सिंहासने व बिभीषण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली येथील दिग्विजय व्यायामशाळेत नुकत्याच या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग विभागातील खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेतून प्रीतम चव्हाण व प्रतिक सावंत यांची राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली.
खेळाडूंना हर्क्युलस जिमनॅसीएमचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक प्रदीप पाटील यांच्यासह कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख संजय पाटील, डॉ.सुनील चव्हाण यांचे मार्गदर्शन तर महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. डी. टी. गवळी, प्राचार्य डॉ. टि.के.जाधव यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष जयराम बापू पाटील यांचे प्रोत्साहन लाभले आहे.