निर्भीडसत्ता न्यूज –
भाजपचे पिंपरी चिंचवड महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिपावली व वाढदिवसानिमित्त यमुनानगर येथे बुधवार (दि. २५) सायंकाळी सात वाजता ठाकरे मैदान येथे सुप्रसिद्ध शिव व्याख्याते नामदेवराव जाधव यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच सर्व नागरिकांसाठी ‘स्नेहमिलन दिपावली फराळा’चे आयोजन करण्यात आले आहे.