निर्भीडसत्ता न्यूज –
वाल्हेकरवाडी, चिंचवड येथील आनंदाभाऊ चिंचवडे यूथ फाउंडेशनच्या वतीने आयोजित किल्ले बनवा स्पर्धेत प्रतापगड किल्ला साकारणा-या ओंकार चव्हाण यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे. महाराष्ट्राचे वैभव असणा-या गड-किल्ले यांची माहिती भावी पिढीस मिळावी, या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली.
चिंचवड वाल्हेकरवाडी येथील रजनीगंधा हौसिंग सोसायटी, आहेरनगर, शीतलबाग कॉलनी या परिसरात किल्ले बनवा स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेस महिला महासंघाच्या संस्थापिका सुजाता चिंचवडे, रजनीगंधा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सागर चिंचवडे आदी उपिस्थत होते. या स्पर्धेत प्रतापगड, जंजिरा, शिवनेरी, रायगड, तोरणा, जलदुर्ग असे विविध किल्ले साकारले होते. महिला मंचाच्या संस्थापिका सुजाता चिंचवडे म्हणाल्या, ‘‘लहान मुलांना दिवाळीत सुटी मिळते. त्यात लहान मुले आणि किल्ले हे अनोखे नाते आहे. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा,महाराष्ट्रातील शिवशाहीचे वैभव असणाºया गड-किल्ल्याची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी, या उद्देशाने किल्ले बनवा स्पर्धा घेण्यात आली. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. त्यातून दुर्ग संवर्धनविषयक जाणीव वाढीला लागावी, असा प्रयत्न आहे.
स्पर्धेचे बक्षीस वितरण झाले. या वेळी फाउंडेशनचे अध्यक्ष यशराज चिंचवडे, श्रीयश माने, ओंकार तिखे, प्रणव मुळीक, आशितोष कानडी, कुणाल शिरोळे, पवन गायकवाड, ऋषिकेश कलाटे, शिवम विनोदे, ऋषी चव्हाण, कुमार चव्हाण, सचिन पटेल, शुभम साळुंखे, संतोष राठोड आदी उपस्थित होते. स्पर्धेत ओंकार चव्हाण- प्रतापगड (प्रथम ), ओम वाल्हेकर -जंजिरा (द्वितीय), मिताली सागरे – शिवनेरी (तृतीय), मनिष भूतकर, यश कुदळे, आदित्य मोरे, प्रतापगड (उत्तेजनार्थ) यांनी यश संपादन केले. बक्षीस विजेत्यांना शिवरायांची प्रतिमा भेट देण्यात आली.