निर्भीडसत्ता न्यूज –
नाना काटे सोशल फौंडेशनच्या वतीने पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिराशेजारी पवना नदीच्या घाटावर उत्तर भारतीय नागरिकांचा पवित्र सण असणाऱ्या छठपूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरसेवक नाना काटे यांच्या हस्ते छटपूजन करण्यात आले.
उत्तर भारतीय नागरिक मंडळाचे ब्रिजेश सिंग, दुर्गेश सिंग, राकेश गुप्ता, धनंजय सिंग, प्रकाश सिंग, अमरजित सिंग, शैलेश सिंग, दुवालप्रसाद मौर्य आदी उपस्थित होते. उत्तर भारतीय नागरिकांच्या वतीने नगरसेवक काटे यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी उत्तर भारतीय नागरिकांना छठपूजा दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.