विद्यार्थी दिवसनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे प्रकाश उत्सव
निर्भीडसत्ता न्यूज –
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन 7 नोव्हेंबर हा ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून सरकारने नुकताच जाहीर केला. त्यानिमित्त पिंपरी चिंचवड जनशक्ती पार्टीच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे प्रकाश उत्सव साजरा करण्यात आला.
7 नोव्हेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी साता-यातील श्री छत्रपती प्रतापसिंह हायस्कुलमध्ये प्रथम प्रवेश घेतला. या महामानवाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लोकजन शक्ती पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा समितीचे अध्यक्ष धुराजी शिंदे, प्रदेश सचिव सचिन जाधव, शहर महिला अध्यक्षा सरिता जामनिक, पुणे शहर सल्लागार सुनिल जामनिक, पिंपरी चिंचवड सचिव अरुण मैराळे, पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष दत्ता गोडसे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष दिनकर ओव्हाळ, राहुल प्रधान, अमोल सौदेकर, ज्योती म्हस्के, मुकेश पाटील, मनोज गजभार, विनायक ओव्हाळ, अंजना कांबळे आदी उपस्थित होते. निनाद जामनिक, सुदर्शन ओव्हाळ, विक्रम मैराळे, अवधुत ओव्हाळ, दिक्षा मैराळे, तनीष्का ओव्हाळ, आम्रपाली ओव्हाळ, आकांशा ओव्हाळ, सिध्दार्थ ओव्हाळ आदी शालेय विद्यार्थ्यांनी पुतळ्यासमोर दिवा लावून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.
अध्यक्ष धुराजी शिंदे, प्रदेश सचिव सचिन जाधव, शहर महिला अध्यक्षा सरिता जामनिक यांच्या हस्ते या शालेय विद्यार्थ्यांना वही, पेन देऊन गौरविण्यात आले.