निर्भीडसत्ता न्यूज –
मंगोलिया येथे झालेल्या नवव्या जागतिक बॉडिबिल्डिंग व फिजिकल स्पोर्टस स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या महेंद्र चव्हाण यांचा सत्कार कला, क्रिडा, साहित्य व सांस्कृतिक समितीचे उपसभापती बाळासाहेब ओव्हाळ यांच्या हस्ते करण्यात आला.
महापालिका भवनात झालेल्या या कार्यक्रमास ई प्रभाग अध्यक्षा भिमाबाई फुगे, ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसदस्य राजेंद्र गावडे, नगरसचिव उल्हास जगताप, क्षेत्रिय अधिकारी मनोज लोणकर, क्रिडा अधिकारी रज्जाक पानसरे, प्रशासन अधिकारी राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते.