निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. सांगवी येथील वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यास पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपमहापौर शैलजा मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
उपमहापौर शैलजा मोरे, माई ढोरे, विधीसमितीच्या सभापती शारदा सोनवणे आदी यावेळी उपस्थित होत्या