निर्भीडसत्ता न्यूज –
पोलीस फ्रेंडस् वेलफेअर असोसिएशन व भाग्योदय क्लिनिक रिट्झ स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मधूमेह दिवसानिमित्त पिंपरी पोलीस स्टेशन येथे पोलीस बांधवांसाठी मोफत मधूमेह तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.
सहाय्यक पोलीस आयुक्त राम मांडुरके, पोलीस निरीक्षक विवेक मुळगीकर, पोलीस निरीक्षक मसाजी काळे, पोलीस फ्रेंडस् वेलफेअर असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष गजानन चिंचवडे, ब प्रभाग अध्यक्ष नगरसेवक सचिन चिंचवडे, नगरसेविका अनुराधा गोरखे, कार्याध्यक्ष गोपाल बिरारी, उपाध्यक्ष अतुल राऊत, संपर्कप्रमुख हरीष मोरे, व्यापारी आघाडी अध्यक्ष भावेश दाणी, योगेश चिंचवडे, डॉ. आशिष सोळंकी, डाॅ. भाग्येश कुलकर्णी, मुकेश चुडासमा, महेश सफारिया, अतुल मोदासरा, विनित शहा, शुभम चिंचवडे, विनय मुथा आदी उपस्थित होते.
सहाय्यक पोलीस आयुक्त राम मांडुरके यांनी असोसिएशन पोलिसांसाठी करत असलेल्या कामाचे कौतुक केले. पोलीस निरीक्षक विवेक मुळगीकर म्हणाले की, पोलीस फ्रेंडस् वेलफेअर असोसिएशन ही संस्था पोलिसांप्रती एक सामाजिक बांधिलकी या नात्याने पोलिसांचे आरोग्य तपासणी शिबिर घेऊन एक चांगला संदेश समाजासमोर ठेवत आहे.
संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गजानन चिंचवडे म्हणाले की, पोलीस फ्रेंडस् वेलफेअर असोसिएशन नेहमीच पोलिसांचे मानसिक शारीरिक व रहिवासी स्वास्थ्य जपण्यास अग्रेसर राहणार आहे. आम्ही पोलीसच नाही तर पोलिसातील माणूस जपतो. त्यासाठी आरोग्य तपासणी, पोलीस रहिवासी परिसर स्वच्छता यांसारखे उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करणार आहे.
यावेळी बी एम आय, कोलेस्ट्रोल, हिमोग्लोबिन, आर्थिटीस, क्रियाक्टिव्ह प्रोटीन, एच. आय. व्ही. आय चेक अप या तपासण्या करण्यात आल्या.