निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिचंवड महापालिकेतील भाजप नगरसेवक तुषार हिंगे एका गुन्ह्यात फरार आहेत. ते पोलिसांचा सापडत नसताना त्यांनी केलेल्या अर्जानुसार महापालिका विधी समितीच्या बैठकीत आज (शुक्रवारी) त्यांची रजा मंजूर करण्यात आली.
नगरसेवक हिंगे यांच्या विरुध्द पोलिसात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी हिंगे फरारी असून पोलिसांना ते सापडलेले नाहीत. दरम्यान, हिंगे यांनी विधी समिती सभापतींकडे रजा मंजुरीचा अर्ज सादर केला आहे. त्यामध्ये आपण न्यायालयीन कामकाजासाठी बाहेरगावी असल्याने पालिकेच्या नोव्हेंबर व डिंसेबर महिन्यातील सर्वसाधारण सभेला उपस्थित राहू शकत नसल्याचे म्हटले होते. रजा मंजूर करण्याची विनंती विधी समितीला केली होती. त्यानुसार विधी समितीच्या बैठकीत आयत्यावेळी हा प्रस्ताव दाखल करून रजा मंजूर करण्यात आली.