निर्भीडसत्ता न्यूज –
महापौर नितीन काळजे आणखी स्पेन दौ-यावर गेलेले असताना आता महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर विदेशवारीवर स्वीडन दौ-यावर जाणार आहेत. ते येत्या सोमवारी (२० नोव्हेंबर) या दौ-यावर रवाना होणार आहेत. त्यांच्यानंतर महापालिका आयुक्तांचा कारभार कोण बघणार, याची उत्सुकता आहे.
महापौर काळजे स्पेन दौ-यावर रवाना झालेले आहेत. २१ नोव्हेंबर रोजी शहरात परतणार आहेत. शहराचे प्रथम नागरिक असलेले महापौर विदेश वारीवरून परतले नाहीत. आता महापालिकेचे प्रमुख कारभारी आयुक्त हर्डीकर विदेश वारीला जाण्याची तयारी करत आहेत. आयुक्त हर्डीकर स्वीडन या देशातील काही महत्त्वाच्या प्रकल्पाला भेट देण्यासाठी जाणार आहेत. त्यांचा हा दौरा अधिकृतपणे २० ते २४ नोव्हेंबर या कालावधीत आहेत. मात्र, ते सात दिवस रजेवर असणार आहेत.
आयुक्त हर्डीकर नसल्यानंतर पालिका आयुक्तपदाचा पदभार कोणाकडे सोपविणार, असा प्रश्न आहे. पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांच्याकडे कारभार सोपविला जाण्याची शक्यता आहे.