निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर येथे कोकणे चौक ते स्वराज गार्डन चौकापर्यंत बी.आर.टी.लगतच्या जागेत अद्ययावत लिनीअर गार्डनचे काम प्रगतीपथावर आहे. या गार्डनच्या कामाची पहाणी नगरसेवक नाना काटे यांनी येथील स्थानिक नागरिकांसोबत पहाणी केली.
उद्यानाच्या सौंदर्यात आणखी भर पडावी म्हणून येथील स्थानिक रहिवाशांनी नवीन कल्पना सुचविल्या. नगरसेवक नाना काटे यांनी नागरिकांच्या सूचना ऐकून घेत त्याची अंमलबजावणी करण्याचे या वेळी आश्वासन दिले.
लिनीअर गार्डनमुळे शहराच्या नावलौकिकात भर पडणार आहे. या गार्डनच्या उभारणीत येथील स्थानिक रहिवाशांच्या संकल्पनेतुन सुशोभिकरणात भर टाकता येईल त्यासाठी परिसरातील सोसायटीचे चेअरमन यांच्यासोबत विद्यमान नगरसेवक नाना काटे यांनी लिनीअर गार्डनची व रोझलँड रेसिडेंसी शेजारील गार्डन पाहणी करून नगरसेवक नाना काटे यांनी नागरिकांना प्रत्यक्ष माहिती दिली. तसेच नागरीकांनी केलेल्या सूचना ऐकून घेतल्या.